एक्स्प्लोर

मुंबईत आजपासून पुन्हा प्‍लास्टि‍क बंदीची मोहिम, प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी विभागनिहाय पथकं

महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 16 लाख 324 आस्थापनांना भेटी दिल्या असून 85 हजार 840 किलोग्रॅम प्रतिबंधित प्‍लास्टिक जप्त करण्‍यात आले आहे. 668 आस्थापनांना तपासणी अहवाल दिले आहेत. तर आतापर्यंत 4 कोटी 64 लाख 30 हजार रुपये इतका दंड वसूल करण्‍यात आला आहे.

मुंबई : मुंबईत आजपासून (1 मार्च) पुन्हा प्‍लास्टि‍क बंदीची मोहिम सुरु होणार आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी विभागनिहाय पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्‍लास्टिक मुक्‍त करण्‍याचे लक्ष्‍य आहे. या मोहिमेत दुकानांसह मंगल कार्यालयं, उपहारगृहं, कार्यालयांमध्‍येही तपासणी होणार आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रात प्रत‍िबंधित प्‍लास्टिक वापरणाऱ्यांवर 1 मार्चपासून पासून कडक कारवाई करण्‍याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले यांसह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जून 2018 पासून आजपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 16 लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास 86 हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त केले आहे. तर सुमारे 4 कोटी 65 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्‍यात आला आहे.

कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश

राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश सर्वांना दिलेत. मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्‍लास्टिक मुक्‍त करण्‍याचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात प्‍लास्टिकवर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू यावर बंदी घातलेली आहे. प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.

कोणत्या वस्तूंवर आहे बंदी

महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात प्‍लास्टिक (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्‍डल असलेल्या व नसलेल्या), प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप्स्, प्लेटस, ग्लास, चमचे इत्‍यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्‍लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्‍यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्‍लास्टिक, प्‍लास्टिकचे वेष्टण यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

310 निरी‍क्षकांची नेमणूक

महानगरपालिका क्षेत्रात, प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी जून 2018 मध्ये ब्ल्यू स्क्वॉडची स्थापना करण्यात आली असून पालिकेच्या बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खात्यातील एकूण 310 निरी‍क्षकांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

प्‍लास्टिकबाबत जनजागृती

दुकाने व आस्‍थापना खात्‍यातर्फे व्‍यापारी संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करुन प्रतिबंधित प्‍लास्टिक न वापरण्‍याबाबत जनजागृती, नाट्यगृहांमध्‍ये प्रयोगाच्‍या सुरुवातीला तसेच मध्‍यंतरात प्रतिबंधित प्‍लास्टिक न वापरण्‍याबाबत प्रेक्षकांना जाहीर सूचना करण्‍याबाबत नाट्यगृह संचालक मंडळास कळविण्‍यात येणार आहे. प्रतिबंधित प्‍लास्टिक कारवाईत ज्‍येष्‍ठ नागरिक आणि सेवानिवृत्त नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिमेची व्‍याप्‍ती वाढवण्‍यात येणार आहे. विभाग स्‍तरावर प्रतिबंधित प्‍लास्टिक पथक तयार करुन ज्‍यामध्‍ये बाजार, अनुज्ञापन, दुकाने आणि आस्‍थापना, आरोग्‍य, परिरक्षण या खात्‍यांतील पथकांचा समन्‍वय अधिकारी नेमण्‍यात येईल. मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्‍या वाहनांवर प्रति‍बंधित प्‍लास्टिकबाबत जनजागृती फलक लावण्‍यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget