एक्स्प्लोर

सर्वसामान्यांना दिलासा! राज्य सरकारकडून सिटीस्कॅनसह प्लाझ्माचे दर निश्चित

राज्य सरकारकडून सिटीस्कॅन आणि प्लाझ्माचे दर निश्चित करण्यात आले आहे. सरकारने सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठित केली होती. त्यानुसार आता दर निश्चित केले आहे.

मुंबई : सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्य सरकारने सिटीस्कॅन आणि प्लाझ्माचे दर निश्चित केले आहेत. सिटीस्कॅनचे दर 12 हजारावरुन 3 हजारांवर आणले आहेत. तर कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या या संसर्ग आजाराच्या या वाढत्या संक्रमणात चाचणी करुन घेणे, त्याच्या निकालाची वाट बघत बसणे जिकीरीचे झाले असतानाच, डॉक्टर कोरोनाच्या चाचणीबरोबर (एचआरसिटी) फुफ्फुसांचा सिटीस्कॅन संशयित कोरोना रुग्णांना करायला सांगतात. त्या 10 ते 15 मिनिटाच्या सिटीस्कॅनवरुन वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णाला कोरोना आहे की नाही किंवा फुफ्फुसला किती इजा झाली आहे हे निदान करुन उपचार देणे सोपे होते. त्यामुळे सध्या बहुतेक खासगी रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना कोरोना चाचणीसोबत पाहिलं सिटीस्कॅन करायला सांगितले जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयात, तपासणी केंद्रात सिटीस्कॅनचे दर हे वेगळे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, याकरिता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्याकरिता समिती गठित करण्यात आली होती. त्यानुसार आता दर निश्चिती करण्यात आली आहे.

यापूर्वी शासनाने अशीच समिती स्थापन करुन कोरोनाच्या (आरटी-पीसीआर) या कोरोनाच्या चाचणीचे खासगी प्रयोगशाळेतील दर निश्चित केले होते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच पद्धतीने सिटीस्कॅनच्या बाबतीत शासन धोरण घेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सिटीस्कॅनचे दर हे रुग्णालय आणि तपासणी केंद्राच्या अनुषंगाने आणि कोणत्या साधनसामुग्रीचा वापर करुन केला जात असून वेगवेगळे आहेत. हे दर 3500-1200 पर्यंत असे आहेत.

काय आहेत नवीन दर?

कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहणार आहे अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या/विशेष चाचण्या यासाठी आकरण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅग (200 मिली) 5500 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास याचाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किमती व्यतिरक्त) केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

CoronaVirus | आजोबा जोमात, कोरोना कोमात! सांगलीत 94 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget