Petrol-Diesel Price Today 20 July in Mumbai : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती जाहीर केल्या आहेत. आज 20 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रासह देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. महागाईनं आधापासूनच होरपळून निघालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यांपासून महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांतील इंधनाचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील शहरांतील दरही स्थिर आहेत. जाणून घेऊया मुंबईसह इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?

मुंबईतील (Mumbai) पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) आजचे दर काय? 

  • पेट्रोलचे दर : 106.31 रुपये प्रति लिटर 
  • डिझेलचे दर : 94.27 रुपये प्रति लिटर 

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).