मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जी व्यक्ती दिसून आल्याचं एका फूटेजमध्ये आढळून आलं होतं, ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याची शक्यता एनआयएकडून वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या ड्रायव्हरनंच याबाबतची माहिती एनायएला दिलेल्या जबाबात नोंदवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्याविरोधात सापडणारे हे सबळ पुरावे पाहता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 


 "पीपीई किट घातलेले सचिन वाझे होते,  त्यांनी केरोसिनने तो जाळला." असं या जबाबात म्हटलं गेल्याचं कळत आहे. दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे. मुख्य म्हणजे जे कपडे मिळाले आहेत, त्यामध्ये एक शर्टही आहे. हे शर्ट वाझेंनी 24 तारखेला घातलं होतं. त्यामुळे आता संशयाची सर्व दिशा ही वाझेंकडेच पोहोचली आहे. 


दरम्यान, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची तपासणी केली असून यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमही सापडली आहे. एक भली मोठी वायर आणि काही कपडेही या कारमध्ये सापडले आहेत. कारमध्ये अनेक डायऱ्याही या सापडल्या आहेत. एवढंच नाह, तर या कारमध्ये अनेक नंबर प्लेट्सही आढळून आल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही मर्सिडीज कार याठिकाणी आणण्यात आली आणि एनआयए अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. 




मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारपासून सुरु झालेल्या या प्रकरणामध्ये आता ही मर्सिडीज कार नेमकी कुठे आहे, याचाच शोध आम्ही सर्वजण येताव परत. ज्यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असता पीपीई किटमध्ये लोकांनाही तसेच विचाक करु द्या. सध्या एनआयएच्या या चौकशीदरम्यान येत्या काळात आणखीही धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचं धमकावत आहे.