एक्स्प्लोर

बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात, आशिष शेलार यांचा नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे वारंवार अंगुलीनिर्देश केला जात आहे. त्यातच बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात, अशा शब्दात आशिष शेलार नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई : "बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात," अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे वारंवार अंगुलीनिर्देश केला जात आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रक जारी करुन आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यातच आता बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहेत. शिवाय बहुतांश सेलिब्रिटी वांद्रे भागात राहतात. या अनुषंगाने प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले की, "वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून अनेक प्रामाणिक मतदार तिथे राहतात. बॉलिवूडची लोक तिथे राहतात. मी बॉलिवूडच्या स्वत: पार्ट्यांना जातो असं परिपत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत, असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वला राहतात."

काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील कांदिवली इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी काही शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या मुद्द्यावरही आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक सरकारमध्ये असल्याचा असं शेलार म्हणाले.

घराबाहेर पडण्याबाबत विचारलं तर मुख्यमंत्र्यांना राग येतो राज्यात कोरोनाचं संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाही, असा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. याबाबत विचारलं तर त्यांना राग येतो, असं आशिष शेलार म्हणाले. पूरग्रस्त भागात विरोधक पोहोचले, मुख्यमंत्री गेले नाहीत. कोणत्याही कोविड सेंटरमध्ये विरोधी पक्षनेते पोहोचले, मुख्यमंत्री नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतोय असं सांगणार आणि प्रत्यक्षात जाणार नाही. प्रश्न विचारले तर राग येतो. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राजेश टोपे राज्यात फिरत आहेत. ते काय चुकीचं काम करत आहेत का? तुम्ही तुमची तब्येत जरुर सांभाळा, पण १२ कोटी जनताही तेवढीच महत्त्वाची आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

तर भाजपच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदाहरण दिलं जातं. पंतप्रधानही घराबाहेर न पडता संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतात, असं शिवसेनेकडून सांगण्याच येतं. यावर आशिष शेलार म्हणाले की, "पंतप्रधान 90 टक्के ई-मेलला रिप्लाय करतात. दर महिन्याला 'मन की बात' करतात. पंतप्रधानांना प्रश्न विचारला तर राग येत नाही, मुख्यमंत्र्यांना राग का येते, कार्यकर्त्यांना राग का येतो, त्यांनी उत्तर द्यावी. भावनांचं राजकारण करुन विषयांतर का करावं, तोंड लपवण्याचं काम का करावं?"

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget