एक्स्प्लोर
राणीच्या बागेतील पेंग्विनकडे गुड न्यूज
भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मादी पेंग्विनने अंडं दिलं.

मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विन्सच्या कुटुंबात गोड बातमी आहे. भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मादी पेंग्विनने अंडं दिलं. त्यामुळे लवकरच या कुटुंबात नवीन सदस्य जन्माला येणार आहे.
राणीच्या बागेत पेंग्विनच्या तीन जोडीतील एका मादीने गुरुवारी अंडं दिलं. सर्वात कमी वयाचा असलेला पेंग्विन मिस्टर मॉल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांच्याकडे ही गुड न्यूज आहे.
फक्त मुंबईतच नाही, तर देशभरात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विन असेल. पेंग्विनच्या जन्मासाठी आणखी 40 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
राणीच्या बागेतले सात पेंग्विन गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या वातावरणात चांगलेच रुळले. मार्च-एप्रिल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा पेंग्विनच्या प्रजननाचा काळ असतो.
मादीने अंडं दिल्यानंतर 40 दिवसांमध्ये त्यातून पिल्लू बाहेर येते. या छोट्या पेंग्विनच्या जन्माला अद्याप सव्वा महिना असला तरी राणीच्या बागेत त्याच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. जन्मानंतर या पिल्लाचं वजन, पोषण याबाबतही काळजी घेतली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
