एक्स्प्लोर

नवी मुंबईत मंडप उभारण्याची परवानगी आता ऑनलाईन

मुंबई उच्च न्यायालयानं यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचं कौतुक करत राज्यातील इतर महानगरपालिकांनी त्यांच्याकडून ही पद्धती शिकून, त्यानुसार काम करण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.

नवी मुंबई : ‘आधी मंडप उभारु, मग परवानगीचं पाहू’ ही पद्धत आता किमान नवी मुंबईतून तरी हद्दपार होण्याची चिन्ह आहेत. नवी मुंबईतील बेकायदेशीर मंडपांवर अंकुश ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं सर्व परवानग्या आता ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडपांच्या ऑनलाईन परवानग्यांसाठी एक खास सॉफ्टवेअर तयार करुन त्याद्वारे वॉर्ड अधिकारी, स्थानिक पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस विभाग, अग्निशमन दल यासर्वांना एकत्र जोडता येणार आहे. जेणेकरून पालिकेकडे येणाऱ्या प्रत्येक अर्जावर सर्व संबंधित विभागांची एनओसी आहे की नाही याची माहिती एका क्लिकच्या आधारे मिळवणं सहज शक्य होईल. मुंबई उच्च न्यायालयानं यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचं कौतुक करत राज्यातील इतर महानगरपालिकांनी त्यांच्याकडून ही पद्धती शिकून, त्यानुसार काम करण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. राज्यभरात सण उत्सवांच्या काळात उभारण्यात येणाऱ्या बेकायदेशीर मंडपांविरोधात दाखल विविध याचिकांवर हायकोर्टात सुनावली झाली. यंदाच्या वर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या किमान दोन महिने आधी सर्व इच्छुक मंडळांनी मंडपासाठीचे आपापले परवानगी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पालिकेकडे भरणं अनिवार्य राहील. सण-उत्सवाच्या तोंडावर आलेला कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. येणाऱ्या प्रत्येक अर्जावर सर्व परवानग्या मिळाल्यानंतर पालिकेचे अधिकारी मंडपाच्याजागी जाऊन स्वत: जागेची आखणी करून देतील. त्याबाहेर मंडप बांधण्याची परवानगी मिळणार नाही. ही आखणी करताना मंडप रस्त्यावरील मुख्य रहदारीपासून दूर राहील, जेणेकरुन ट्राफिकची कोणतीही समस्या उद्भवणार नाही.  मंडप बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचे फोटो काढून ते देखील सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटवर अपलोड करणं पालिका अधिकाऱ्यांना बंधनकारक राहील, असं पालिकेतर्फे हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget