एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन महागलं!
मोठा गाजावाजा करत मुंबई महापालिकेनं आणलेले पेग्विंन पाहण्यासाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.
मुंबई : मुंबईमधील भायखळातल्या राणीच्या बागेतील पेंग्विनला पाहण्यासाठी करण्यात आलेली शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे. सध्या राणीच्या बागेचं प्रवेश शुल्क 5 रुपये आहे. मात्र, उद्यापासून हे दर प्रत्येक व्यक्तीसाठी थेट 50 रुपये इतके करण्यात येणार आहेत.
याशिवाय आई-वडील, 2 मुलं अशा पूर्ण कुटुंबासाठी 100 रुपये आणि 12 वर्षांखालील मुलांसाठी 25 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी बीएमसीनं राणीच्या बागेत पेंग्विन आणले, त्यावेळी पेंग्विन दर्शनाचे दर निश्चित केलेले नव्हते. अखेर पालिकेनं बैठक घेऊन पेंग्विन दर्शनाच्या शुल्कात वाढ केली. ती शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे. या वाढीवर मुंबईकरांकडून मात्र टीका होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement