एक्स्प्लोर

Parambir Singh : परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या, अनुप डांगे प्रकरणाचा तपास CBI कडे वर्ग

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची योग्य रित्या चौकशी होत नसल्याने तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केली होती. अखेर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून याबाबतची माहिती अनुप डांगे यांना देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
गेल्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक अनुप संभाजी डांगे यांची त्यावेळी गावदेवी पोलिस ठाण्यातून दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात त्यांची बदली करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस तेथे गेले होते. त्यावेळी पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी जीतू नवलानी याला आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर परमबीस सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यावेळी डांगे यांनी त्यावेळी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. त्यात डर्टी बन्स पबचे मालक जितू नवलानी याने परमबीर सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केला होता, असा आरोप पत्रात केला होता. 

या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. तसेच सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत संबंधांबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. 2 फेब्रुवारी, 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत नाराजी व्यक्त करत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी, ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी, ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
Manoj Jarange Audio Clip Marathi News: 500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
Mumbai Air Quality Marathi News: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget