एक्स्प्लोर

Param Bir Singh : परमबीर सिंहांचं लवकरच निलंबन होण्याची शक्यता, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी?

Parambir Singh Update :  तत्कालीन गृहमंत्र्यांवर 100 कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांचं लवकरच निलंबन होण्याची शक्यता आहे.

Parambir Singh Update :  तत्कालीन गृहमंत्र्यांवर 100 कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांचं लवकरच निलंबन होण्याची शक्यता आहे. कारण परमबीर यांच्या निलंबना संदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचं उल्लंघन केलं. याशिवाय एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपकाही ठेवण्यात आलाय. सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती मिळतेय. त्यामुळे एकीकडे कामावर रुजू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परमबीर यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. तरी, महाविकास आघाडी सरकारशी पंगा घेणाऱ्या परमबीर सिंह यांना घरचा रस्ता दाखवला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची तब्बल एका तासासाठी भेट

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. तसेच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. 

चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगानं परमबीर सिंहांना बजावलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. परंतु, आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये तब्बल एका तासासाठी चर्चा झाली. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते कळू शकलं नाही. काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे.

परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी

सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याचं समन्स त्यांना पाठवलं आहे. मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आलंय. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलं असल्याची माहिती आहे. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे. अट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंह मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. कांदिवलीमध्ये सात तास चौकशी झाल्यानंतर परमबीर सिंह ठाण्याच्या ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget