एक्स्प्लोर

पॅराशूट तेलाबाबत 'त्या' वादग्रस्त व्हिडिओ ब्लॉगचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात

व्हिडिओ ब्लॉगर असलेल्या अभिजीत भन्साली यांनी युट्यूबवर पोस्ट केलेल्या पॅराशूट तेलाबाबतच्या वादग्रस्त मजकूराविरोधात मेरिको कंपनीने कोर्टात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या सुनावणीनंतर हायकोर्टानं संबंधित पोस्ट सोशल मीडियावरुन हटविण्याचे आदेश भन्साली यांना दिले होते.

मुंबई : अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, मात्र सोशल मिडियावर मांडलेल्या मतांबाबत जनमानस प्रभावित होत असेल तर त्या मतांनाही विश्वासाचे बंधन असायला हवे. तसेच इंटरनेट आणि सोशल मीडियावरून प्रचंड माहिती मिळत असते आणि लोक त्याला सरसकट ज्ञान समजण्याची चूक करतात, असं स्पष्ट मत एका महत्त्वाच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

व्हिडिओ ब्लॉगर असलेल्या अभिजीत भन्साली यांनी युट्यूबवर पोस्ट केलेल्या पॅराशूट तेलाबाबतच्या वादग्रस्त मजकूराविरोधात मेरिको कंपनीने कोर्टात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या सुनावणीनंतर हायकोर्टानं संबंधित पोस्ट सोशल मीडियावरुन हटविण्याचे आदेश भन्साली यांना दिले होते. याविरोधात भन्साली यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

भन्साली यांनी केलेली याचिका हायकोर्टाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली आहे. याचिकादार आणि कंपनीने आपापसात बसून व्हिडिओमधील वादग्रस्त भागावर चर्चा करावी आणि तो हटविण्याबाबत ब्लॉगरने विचार करावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

याचिकेवर सविस्तर सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ हटविण्याबाबत कंपनीने कारवाई करु नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. मात्र संबंधित तेल विकत घेऊ नका, असे व्हिडिओमधून सुचविण्यात आले आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. तर संपूर्ण अभ्यासानंतरच आपण हा संबंधित व्हिडिओ पोस्ट केला आहे, असा दावा याचिकादाराने केला आहे.

सोशल मीडियाचा वापर सावधगिरीने करायला हवा, सोशल मीडियावर व्यक्त केल्या जाणाऱ्या मतांचा समाजावर प्रभाव होत असतो, त्यामुळे त्याला विश्‍वासार्हतेचंही बंधन असायला हवे. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्वाचे असते, असं निरीक्षणही यावेळी न्यायालयाने व्यक्त केले आहे.

मानहानीच्या दाव्यातील तरतुदीनुसार कोणीही चुकीची माहिती किंवा मत व्यक्त करु नये, आणि त्या व्यक्तीनं व्यक्त केलेलं मत हे वास्तविकता असेलच असं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा हे दोन्ही मूलभूत अधिकार असले तरी अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे अधिक उच्च असते, त्यामुळे या मुद्दयावर सविस्तर सुनावणी व्हायला हवी, असं मतही यावेळी हायकोर्टानं व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त

Embed widget