एक्स्प्लोर

होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर

शिवसेना आणि भाजप यांनी कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरार : पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकांच्या रणसंग्रामाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना आणि भाजप यांनी कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या पालघरमध्ये पातळी सोडून प्रचार सुरु आहे. होय आम्ही कुत्रे आहोत. तीस वर्षांपासून वफादार कुत्र्यासारखं लोकांबरोबर, मतदारांबरोबर आम्ही इमानदार आहोत. असंही हितेंद्र ठाकूर यांनी दरडावून सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने शिवसेना आणि भाजपची वरिष्ठ नेते मंडळी पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. सर्व पक्ष वसई-विरारमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांना टार्गेट करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूरांना कुत्रा-मांजर संबोधून टीका केली होती. त्यावर ठाकूरांनी उत्तर दिलं. पालघर पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांना शिवसेना-भाजपपेक्षा 'शिटी'ची सीट आल्याचं चालेल. शिवसेनेला भाजपची सीट आलेली चालणार नाही आणि भाजपला शिवसेनेची सीट आलेली चालणार नाही. त्यामुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचा दावाही ठाकूरांनी केला.
इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला
उद्धव आणि आपल्यात झालेली भेट ही केवळ योगायोग असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. यावेळी आपली सीट येणारच असं उद्धव यांना सांगून, निवडणुकीत मदत मागितल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र उद्धव ठाकरेंनी आम्ही शिटी घेतो, तुम्ही भगवा खांद्यावर घ्या, अशी मिश्कीली जोडल्याचंही ठाकूरांनी सांगितलं. पालघर पोटनिवडणुकीत स्टार प्रचार हे आमचे कार्यकर्ते असून, त्यांच्या जोरावर ही निवडणूक आम्ही लढवत असल्याचं ठाकूरांनी सांगितलं. बाहेरुन आलेले नेते हे केवळ 28 मेपर्यंत असतील, मात्र आम्ही नागरिकांसाठी 365 दिवस असणार आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. गेल्या निवडणुकीचं चित्र बघितल्यावर मोदींच्या लाटेतही आम्ही पाच विधानसभेच्या एकूण मतदानात 'नंबर वन' वर होतो. त्यामुळे आताही 'नंबर वन' वर आहोत आणि आमची सीट निवडून येणार, असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget