एक्स्प्लोर
तरुणीची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरुन जाळण्याचा प्रयत्न

पालघर: पालघर जिल्ह्यातल्या वाणगाव-कासा रोडच्या साखरा घाटात एका तरुणीचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह एका सुटकेसमध्ये होता आणि ही सुटकेस पूर्णपणे जळालेली होती.
तरूणीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला जाळण्यात आल्याचं प्रथमदर्शनी समजतं आहे. दरम्यान या तरुणीची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. मात्र मृत तरुणी अंदाजे 18 ते 20 वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात कलम 301 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आशिया कप 2022
पुणे
हिंगोली
Advertisement
Advertisement



















