मुंबई: लिफ्टमध्ये अडकून एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील बेहराम पाडा इथल्या आशियाना इमारतीत शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली.
लिफ्टच्या मार्गात असलेल्या काचेतून डोकावत असताना लिफ्टमध्ये अडकून तिचा मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेमुळे आशियाना इमारत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच लिफ्टमधील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.