एक्स्प्लोर
Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराचा थरार, पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान ट्रेनमध्ये काय घडलं?
Jaipur Express Firing : मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या (RPF) हवालदाराने गोळीबार केला. यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
Jaipur Express Firing : मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या (RPF) हवालदाराने गोळीबार केला. यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार (Firing) झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन कुमार चौधरीने गोळीबार केला. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे.
आरोपी चेतन हा मुंबई सेंट्रल आरपीएफमध्ये तैनात आहे. त्याचे पोलीस ठाणे लोअर परळ इथे आरपीएफ कार्यालय आहे. तर मृत एएसआय टिकाराम हे दादर आरपीएफमध्ये तैनात होते. प्राथमिक माहिती अशी की, आरोपी चेतनने मानसिक छळ आणि एका कारणावरुन अस्वस्थ असल्याची तक्रार केली आहे. त्याचं कारण काय हे अद्याप स्पष्ट नाही. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर दोन कॉन्स्टेबलचे जबाब घेण्यात आले आहेत.
पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान ट्रेनमध्ये काय घडलं?
आरोपी चेतन हा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती. नुकतीच त्याची मुंबईत नियुक्ती झाली. आरपीएफच्या सूत्रांनी सांगितलं की, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंगसाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन ते चार पोलीस नेहमीच तैनात असतात. एक्स्प्रेस ट्रेनवर नजर ठेवणं याला ट्रेन एस्कॉर्टिंग म्हणतात. ते ट्रेनने प्रवास करतात. काल आरोपी चेतनने सूरत रेल्वे स्थानकापर्यंत एक ट्रेन एस्कॉर्ट केली. सूरत रेल्वे स्थानकावर त्याने काही तास विश्रांती घेतली. आज पहाटे 2.50 वाजता चेतन सूरत रेल्वे स्थानकावरुन जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. चेतनसोबत आणखी दोन हवालदार आणि एएसआय टिकाराम हे सर्वांचे नेतृत्व करत होते. जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या एस्कॉर्टिंगसाठी तीनही हवालदार आणि एक एएसआय होते.
गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी शेवटचा मुक्काम वापी होता. वापी ट्रेनचा पुढचा थांबा बोरीवली होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जात असताना चेतनने गोळीबार सुरु केला. विरार स्थानकानंतर आरोपीने चेन पुलिंग केले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण आधीच सतर्क झालेल्या रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्याला पकडले. गाडी नंतर बोरीवली रेल्वे स्थानकावर नेण्यात आली, जिथे मृतदेह काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कांदिवली येथे ठेवण्यात आले आहेत. ट्रेन मुंबई सेंट्रल रेल्वे यार्डमध्ये पोहोचली.
संबंधित बातमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement