विकोचे संजीव पेंढरकर देणार सेल्स आणि मार्केटिंगचे ऑनलाईन धडे
गेली45 वर्षे उद्योजकता क्षेत्रात मुशाफिरी केल्याने या व्यवसाय परिसंस्थेत मार्गक्रमण करणे किती आव्हानात्मक आहे हे त्यांना माहित आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उद्योजकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल त्या गोष्टी ते निदर्शनास आणून देतात. जेणेकरून इतर सर्व उद्योजकांचा प्रवास कमी गोंधळाचा आणि कमी त्रासदायक व्हावा असा त्यांचा हेतू आहे.

शिका उद्योजकीय क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट आणि व्यापाराची गुपितं, विको लॅबोरेटरिजचे संचालक श्री. संजीव पेंढरकर यांच्या मार्फत त्यांच्या मार्केटिंग व सेल्सप्रमोशन” या ऑनलाईन अभ्यासक्रमातून जो 1ऑगस्ट 2020 पासून सुरु होत आहे. हा असा अभ्यासक्रम आहे ज्यात मार्केटिंगमध्ये चाणक्य होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाने सहभागी झालेच पाहिजे.
‘मार्केटिंग आणि सेल्स प्रमोशनमध्ये घडवा तुमचे करियर' या 1 ऑगस्ट 2020 पासून सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या अभ्यासक्रमातील संजीव पेंढरकर यांच्या अनुभवावर आधारित 10 भाग सर्वांसमोर उलगडण्यासाठी सज्ज आहेत. या अभ्यासक्रमात मार्केटिंग ते सेल्स प्रमोशन या विषया संबंधित त्या सर्व गोष्टी शिकायला मिळतील. ज्या व्यवसाय वृद्धीसाठी गरजेच्या असतात आणि प्रत्येक उद्योजकाला माहित देखील असायल्या हव्यात.
ज्यांना एक यशस्वी व्यावसायिक होऊन दाखवायचे आहे, त्यांच्यासाठी तर हा अभ्यासक्रम मार्गदर्शक आहेच. पण जे आधीपासूनच व्यावसायिक आहेत व व्यावसायिक यशासाठी धडपड करत आहेत त्यांना सुद्धा हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. कोरोनाच्या संकटामध्ये, व्यवसाय बुडण्याच्या स्थितीत आहेत आणि अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशावेळी आपले ज्ञान आणि संसाधन या दोन्हींचा वापर करून नवोदित आणि प्रस्थापित उद्योजकांना पाठबळ पुरवणे आणि पुन्हा एकदा त्यांच्या व्यवसायाला उभारी देणे या उद्देशाने श्री. संजीव पेंढरकर यांनी या कार्यक्रमाची रचना केली आहे.
श्री. संजीवपेंढरकर यांनी आपल्या चार दशकांच्या ज्ञानाचा या अभ्यासक्रमात पुरेपूर वापर केला असून केला असून नवीन कल्पनेतून उत्तम व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मार्केटिंग कौशल्यांची त्यांनी ओळख करून दिली आहे. गेली45 वर्षे उद्योजकता क्षेत्रात मुशाफिरी केल्याने या व्यवसाय परिसंस्थेत मार्गक्रमण करणे किती आव्हानात्मक आहे हे त्यांना माहित आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उद्योजकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल त्या गोष्टी ते निदर्शनास आणून देतात. जेणेकरून इतर सर्व उद्योजकांचा प्रवास कमी गोंधळाचा आणि कमी त्रासदायक व्हावा असा त्यांचा हेतू आहे.
या बद्दल सांगताना श्री. संजीव पेंढारकर म्हणाले, “प्रमोशन हे जाहिरात आणि वैयक्तिक विक्री या मधील दुवा म्हणून कार्यकर्ते. बाजारपेठेच्या वैविध्यतेमुळे सेल्स प्रमोशनचे महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सेल्स प्रमोशन हे ग्राहकांच्या मनातील विशिष्ट उत्पादना बद्दल आणि निर्मात्याबद्दल असलेली असमाधानाची भावना काढून टाकण्यास मदत करते. सेल्स प्रमोशन ही संभाव्य ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची एक प्रक्रिया आहे.
पुढे ते म्हणाले, “या अभ्यासक्रमाच्या सर्व भागांमध्ये, मी व्यवसायात सांगितली जाणारी काही गुपितं उलगडण्याचा आणि उद्योजकांना जरी मार्गात कितीही अडथळे आले तरी माघार न घेता कसे पुढे चालत राहावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.”
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
संपूर्ण 12 भाग हे दोन्ही इंग्रजी आणि मराठी भाषेत संभाषित केले जातील. अभ्यासक्रमाची एकूण फी रुपये 2500 /- आहे. ज्यामध्ये प्रत्येक भागाची फी रुपये 250/- आहे. या अभ्यासक्रमासोबत अर्जदारांना खाजगी गटाचे सदस्यत्व देण्यात येईल. हा समूह परस्परसंवादी आणि सक्षम वातावरण निर्माण करण्यास मदत करेल. यामुळे सर्व सहभागी सदस्य एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करतील आणि त्यातून उद्योजक होण्याची त्यांची प्रेरणा अधिक बळावेल.
इतकेच नव्हे तर, या सदस्यतेमधून अनेक माहिती पूर्ण व्हिडीओज सोबत व्यवसायांच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातील.
अभ्यासक्रमाचे फायदे
हा अभ्यासक्रम मार्केटिंग आणि सेल्समध्ये स्वत:चे नाव मोठे करू इच्छीणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा पाया अधिक मजबूत करेल. हा अभ्यासक्रम त्यांना मार्केटिंग प्लान बनवण्यात आणि यशस्वी मार्केटिंग करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारी व्यावसायिक धोरणे आखण्यात मदत करेल.
नमस्कार मित्रहो,
तुमचा उत्साह बघून आम्हाला खरंच आनंद झाला असून तुम्हाला परिपूर्ण शिकवणी देण्यासाठी आम्ही शक्य तितके प्रयत्नशील आहोत. स्टार्टअप्स आणि सध्या सुरु असलेल्या व्यवसायांसाठी विशेषतः सेल्स आणि मार्केटिंगवर आधारित असलेला आणि आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक व विको लॅबोरेटरिजचे संचालक श्री. संजीव पेंढरकर यांच्या अनुभवातून तयार झालेला हा नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम तुम्हाला, सेल्स आणि मार्केटिंगमधली कौशल्ये आत्मसात करण्यात मोलाची मदत नक्कीच करेल. या अभ्यासक्रमाला दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून सुरुवात होईल.
“ऑनलाइन रेकोर्डेड मार्केटिंग आणि सेल्स प्रमोशन प्रशिक्षण अभ्यासक्रम” यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी–
https://forms.gle/7Bk4ieMkkQMDctY99























