एक्स्प्लोर

ऑनलाईन कंपनीकडून नोकर देण्याच्या नावाखाली फसवणूक

घरकामासाठी पूर्णवेळ नोकर पुरवण्याच्या नावाखाली देशभरातील 150 लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना विरारमधून अटक करण्यात आली आहे.

वसई : क्विकर डॉट कॉम या कंपनीच्या माध्यमातून घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ विश्वासू नोकर देण्याचे अमिश दाखवून, विविध राज्यातील शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरारच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीमधील दोन जणांना गजाआड केले आहे. कानपूर, हैदराबाद, बंगळुरु, दिल्ली, नागपूर, पुणे, शिमला, वाराणसी यासह अन्य राज्यातील 150 पेक्षा जास्त लोकांची या टोळीने आर्थिक फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यापैकी 2 जणांना अटक केली असून, त्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राज जयप्रकाश सक्सेना आणि अर्जुन सत्यनारायण नाईक अशी अटक आरोपींची नावे आहेत. राज हा विरार ग्लोबल सिटी येथे तर अर्जुन हा सांताक्रूझ येथे राहतो. या दोघांनी आयकॉन मेड सर्व्हिस आणि समर्थ इंटरप्राइजेस नावाच्या दोन कंपन्यांची 2 महिन्यांसाठी क्विकर डॉट कॉमवर नोंदणी केली होती. या नोंदणीच्या आधारे पूर्णवेळ घरकाम करण्यासाठी नोकर देत असल्याची जाहिरात टाकली होती. या जाहिरातीद्वारे हे दोघे लोकांची फसवणूक करत होते. ऑनलाइन नोकर देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे रॅकेट विरार मध्ये कार्यरत असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना मिळाली होती. त्याच्या आदेशावरून विरार स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी त्याचा तपास करून राज सक्सेना या आरोपीला 24 नोव्हेंबर रोजी विरारमधून ताब्यात घेतले. सक्सेना याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर मेड सर्व्हिसच्या नावाखाली देशभरातील अनेक लोकांची सक्सेना याने आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर अर्जुन नाईक याला 28 नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ येथून ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीत फसवणुकीचे रॅकेट बाहेर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Embed widget