वसई : मीरारोडच्या पेणकर पाडा येथील 'आधार ओल्ड एज होम - वेलनेस सेंटर' वृद्धाश्रमात एक महिला वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वृध्दाश्रमातील संचालकांनी चूक कबूल करत त्या महिलेला कामावरून काढून टाकल्याचं सांगितलं आहे.
मीरारोडच्या पेणकर पाडा येथील 'आधार ओल्ड एज होम - वेलनेस सेंटर' वृद्धाश्रमात एक महिला वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ त्या वृध्दाश्रमाजवळ राहणाऱ्या एका महिलेने काढला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ आम आदमी पक्षाचे राजीव सिंह यांना मिळाला. या व्हिडीओमध्ये एका वृध्द आज्जीला एक महिला मारहाण करत असताना दिसत आहे.
व्हिडीओ मिळाल्यानंतर राजीव सिंह यांनी आधार ओल्ड एज होममध्ये झालेल्या गैरवर्तनाची चौकशी करुन कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने समाजातील अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी कोणतीही कारवाई नाही केली. मात्र या वृध्दाश्रमातील संचालकानी त्यांची चूक कबूल करत त्या महिलेला कामावरून काढून टाकल्याच सांगितलं आहे.
या वृध्दाश्रमात 70 ते 90 वयोगटातील तेरा ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यात आठ महिला व पाच पुरुष आहेत. तसेच तीन काळजीवाहू देखील आहेत.
वृद्धाश्रमात आजीला महिलेकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 12:31 PM (IST)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने समाजातील अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी कोणतीही कारवाई नाही केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -