एक्स्प्लोर

मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!

मुंबई : महापालिकेत बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अमराठी नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या निवडणुकीत 61 अमराठी नगरसेवक होते, तर यावेळी हा आकडा 73 वर गेला आहे. यामध्ये 23 गुजराती, 12 उत्तर भारतीय आणि एका दक्षिण भारतीय नगरसेवकाचा समावेश आहे. 73 पैकी तब्बल 36 अमराठी नगरसेवक भाजपकडून निवडून आले आहेत. त्यात 23 गुजराती, 12 उत्तर भारतीय आणि एका दक्षिण भारतीयाचा समावेश आहे. भाजपकडून एकही मुस्लीम नगरसेवक निवडून आलेला नाही. तर शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चार अमराठी नगरसेवकांचा समावेश आहे. निवडून आलेल्या अमराठी नगरसेवकांची पक्षनिहाय संख्या
  • गुजराती – 23 भाजप, 1 शिवसेना
  • उत्तर भारतीय – 12 भाजप, 1 शिवसेना, 1 काँग्रेस
  • मुस्लीम – 9 काँग्रेस, 1 अपक्ष, 2 सेना, 6 राष्ट्रवादी, 6 सपा, 3 एमआयएम
  • दक्षिण भारतीय – 2 काँग्रेस, 2 शिवसेना, 1 भाजप
  • ख्रिश्चन – 3 काँग्रेस
मुंबई महापालिकेत नेहमीच मराठी नगरसेवकांचं वर्चस्व राहिलं आहे. पाच वर्षांपूर्वी 17 गुजराती, 15 उत्तर भारतीय, तर 21 मुस्लीम नगरसेवक मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करत होते. यावेळी उत्तर भारतीय नगरसेवकांची संख्या वाढलेली नसली तरी गुजराती नगरसेवकांची संख्या 17 वरून 24 वर पोहोचली आहे. यातील 23 नगरसेवक एकट्या भाजपचे, तर एक नगरसेवक शिवसेनेचा आहे. 24 नगरसेवकांपैकी 16 गुजराती नगरसेवक हे पश्चिम उपनगरातून निवडून आले आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये कांदिवली आणि मालाड या पट्ट्यात सात हिंदी भाषिक, तर संपूर्ण शहरात 15 हिंदी भाषिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच दहिसर ते मालाड या भागात भाजपने 11, तर काँग्रेसकडून तब्बल 23 हिंदी भाषिक उमेदवारांना तिकीट दिलं होतं. शिवसेनेचे तीन हिंदी भाषिक उमेदवारही याच पट्ट्यात होते. या भागातून यावेळीही सात उत्तर भारतीय, तर संपूर्ण शहरातून 14 उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आले. यात 12 भाजपचे, एक सेनेचा, एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. उमेदवारांची संख्या
  • शिवसेनेने 227 पैकी 7 गुजराती, 5 मुस्लीम, 4 उत्तर भारतीय उमेदवार दिले होते.
  • भाजपने 195 पैकी 120 मराठी, 30 गुजराती, 25 उत्तर भारतीय, तर 5 मुस्लीम उमेदवार दिले होते.
  • काँग्रेसने 227 पैकी 115 मराठी, तर 22 गुजराती, 33 उत्तर भारतीय आणि 42 मुस्लीम उमेदवार दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
Embed widget