एक्स्प्लोर
Advertisement
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत युतीचा निर्णय नाही!
मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. मात्र या बैठकीत मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत फक्त निकाल लागलेल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
काँग्रेसशी युतीच्या चर्चेचा प्रश्नच नाही : आशिष शेलार
25 पैकी जळगाव, चंद्रपूर, वर्धा, लातूर, गडचिरोली या पाच जिल्हा परिषदांवर भाजपची स्वबळावर सत्ता आली आहे. तर रत्नागिरीत शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यात शिवसेनेशी युती केली तर 25 पैकी 12 ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार आहे.
शिवसेना राज्यात सत्तेत असेपर्यंत महापालिकेत पाठिंबा नाही: काँग्रेस
युती झाली तर कुठे सत्ता येऊ शकते?
(अध्यक्ष आणि उपाध्यक्ष)
नाशिक - शिवसेना अध्यक्ष, भाजप उपाध्यक्ष
बुलढाणा - भाजप अध्यक्ष, शिवसेना उपाध्यक्ष
यवतमाळ - शिवसेना अध्यक्ष, भाजप उपाध्यक्ष
औरंगाबाद - भाजप अध्यक्ष शिवसेना उपाध्यक्ष
जालना - भाजप अध्यक्ष शिवसेना उपाध्यक्ष
हिंगोली - शिवसेना अध्यक्ष भाजप उपाध्यक्ष
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
अर्थात हे सर्व मुंबईत शिवसेनेशी होणाऱ्या युतीवर अवलंबुन आहे. त्यामुळे मुंबईत सेना भाजपची युती होण्यावर जिल्हा परिषद आणि महापालिकांचं भवितव्य ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement