Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्यासाठी चर्चेत असतात. कल्याणमध्ये बोलताना गडकरी यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे. गडकरी यांनी म्हटलं की,  दिल्लीमध्ये गेल्यावर दोन दिवसात तब्येत बिघडते. आता मी ट्रान्सपोर्टचा मिनिस्टर असल्याने हातात दांडा घेवून बसलोय. पेट्रोल डिझेलचा वापर कसा कमी होईल याकडे लक्ष देतोय. तुम्ही वाहनांना लोन देता मात्र जर शक्य झालं तर ग्रीन फ्युल किंवा इलेक्ट्रिक वाहनावरील कर्जावरील व्याजदरात थोडी सवलत द्या अशी विनंती बँकेला केली .चार वर्षात पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल असा विश्वास आहे, असं गडकरी म्हणाले. 


गडकरी म्हणाले की, येणाऱ्या काळात समाजाला सुखी समृध्दी करायचं असेल तर समाजाला ध्वनी प्रदूषण ,जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे असं आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी  केलं. दी कल्याण जनता सहकारी बँक 50 व्या वर्षात पदार्पण करत असून बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ उपस्थित होते . 


... तर सगळी जनता एसी बसमध्ये फिरू शकते 


पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं की, दिल्लीत माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. 100 टक्के इथोनोल वर चालणारी गाडी आहे मी या गाडीमधून मुख्यमंत्र्यांना फिरवतो. त्यांना सांगतो तुमच्या राज्यातील पेट्रोल डिझेल बंद करा. मुंबई चालणारी एक इलेक्ट्रिकची बस नॉन एसी 39 रुपये किलोमीटर, एसी 41  रुपये पर किलोमीटर आणि बेस्टची डिझेल बस 115  रुपये पर किलोमीटर. त्यामुळे मुंबई ठाणे कल्याण मध्ये फिरणाऱ्या सर्व बस इलेक्ट्रिक झाल्या तर 30  तक्के भाडे कपात करून सगळी जनता एसी बसमध्ये फिरू शकते असे सांगितले.


मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो


गडकरी म्हणाले की, 1995 साली मंत्री असताना त्यावेळेस तेराशे कोटीचं बजेट होतं. ठाणे भिवंडी बायपास हा पहिला रस्ता बीओटीवर केला होता. तेव्हा मला प्रश्न विचारला होता की, रस्ते बीओटीवर काढता मग सरकार बीओटीवर का देत नाही. पण सरकारजवळ पैशांची कमी होती, त्यावेळेस पब्लिक बाँडमध्ये गेलो, हे सगळे रस्ते पूल केले व त्याचे पैसे वसूल झाले . तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता विकला आणि 8 हजार कोटी कमावले, मात्र हे पैसे राज्यातील विकास कामासाठी खर्च होणार आहे. वरळी बांद्रा या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मजबूरीही होती, बजेट कमी होते. मात्र मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो अशी माहिती देखील त्यांनी दिली. जो रिटायर,पेंशनर ,कॉन्स्टेबल आहे, जो नोकरी करतो त्याला 8 टक्के  रिटर्न द्यायचे आणि त्याच्या पैशातून हाय वे बांधायचे असं देखील ते म्हणाले.