एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी नितीन गडकरी 'मातोश्री'वर

मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. मुलगी केतकीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देण्यासाठी ही भेट झाली. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, राजकीय चर्चा झाली नाही, असं नितीन गडकरींनी भेटीनंतर स्पष्ट केलं. नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात सुरु असतानाच, शिवसेना आणि भाजपचं गळ्यात गळे घालणं सुरुच आहे. एकीकडे शिवसेना खासदार जिल्हा बँकांवरील निर्बंधाविरोधात मोदींच्या दरबारी पोहोचले आहे. तसंच मोदींनी मवाळ भूमिका न घेतल्यास भाजपविरोधात दंड थोपवण्याची तयारीही शिवसेनेने केली आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरींनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. गडकरींच्या मुलीच्या लग्नाच्या आमंत्रणाच्या निमित्ताने ही भेट झाली.
Before You Go
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं






















