एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’वर जाण्यास वेळ, पण कोपर्डीत जाण्यास नाही : नितेश राणे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीवर डिनरसाठी जाण्यास वेळ आहे, मात्र घटनास्थळी जाण्यास वेळ नाही, असा घणाघात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला. अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले.   विधानसभेचे कामकाज सुरु होताच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी स्थगन प्रस्ताव आणला, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी विधानसभेत निवेदन देऊन चर्चेला स्थगन प्रस्तावाला छेद देण्याचा प्रयत्न केला.   “कोपर्डी, कर्जत येथील घटनेबाबत मी दिलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारला नाही. पोलिसांनी माहिती दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनास्थळी जाण्यास वेळ नाही. मात्र मातोश्रीवर जाण्यास मुख्यमंत्र्यांकडे वेळच वेळ आहे. हे सरकार फक्त ट्विटरवर चालले आहे. सरकार आमच्या सदस्यांना बलात्कारसारख्या गंभीर घटनेवर चर्चा करू देत नाही. उद्या सुद्धा आम्ही याबाबत स्थगन प्रस्ताव मांडणार आहोत”, असे नितेश राणे म्हणाले.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतरही विरोधक चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच चर्चा करावी,अशी मागणी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही ही घटना अतिशय गंभीर असून सरकार निवेदन देऊन विषय संपवू शकत नाही, असे स्पष्ट केले.   विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानपरिषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करू लागल्याने सभागृहात गोंधळ उडाला. मात्र अध्यक्षांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली.   दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींना कडक शासन करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर उद्या मंगळवारी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime News: नवऱ्याला संपवलं, बॉडीचे तीन भाग केले, प्रियकराच्या ऑटो रिक्षातून गवळीदेवच्या डोंगरावर टाकले, ऐरोलीतील केसची स्टार्ट टू एंड स्टोरी
नवऱ्याला संपवलं, बॉडीचे तीन भाग केले, प्रियकराच्या ऑटो रिक्षातून गवळीदेवच्या डोंगरावर टाकले, ऐरोलीतील केसची स्टार्ट टू एंड स्टोरी
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Embed widget