अंजली दमानियांनी सहार पोलिस स्टेशन जाऊन तक्रार दाखल केली. दमानियांपाठोपाठ काँग्रेस आमदार नितेश राणेही सहार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
दरम्यान खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देणी त्वरीत द्यावी, यासाठी अंजली दमानिया यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
खंबाटा एव्हिएशन कंपनीकडून कामगारांचे वेतन देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांच्यावरही कामगारांचं अहित करण्याचे आरोप केले होते.
VIDEO : अंजली दमानियांनी काल नितेश राणेंवर काय आरोप केले होते?