वसई: पोषण आहाराच्या नावाखाली वसई-विरारमधील लहानग्यांना एक्स्पायरी डेट संपलेलं अन्न देण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. वसई-विरार पालिकेच्या घरपट्टी विभागानं हा भांडाफोड केला आहे.


राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे वसई-विरार आणि पालघर क्षेत्रातील 6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना हा पोषण आहार देण्यात येतो. वसईच्या नाईकपाडा येथील शलाका महिला मंडळाला याप्रकरणी ठेका देण्यात आला. मात्र, मुलांना पुरवण्यात येत असलेल्या अन्नांच्या पाकिटावरच्या तारखा खोडल्याचं निदर्शनात आलं आहे.

पालिकेच्या घरपट्टी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एक जीप तसंच महिला मंडळाच्या एका गोदामातून थीनर, इंक आणि स्टॅम्प ताब्यात घेतलं आहे. या पुढील कारवाई अन्न आणि औषध विभागाकडून करण्यात येत आहे.