एक्स्प्लोर
नववीतल्या विद्यार्थिनीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेजमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता घडली. ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती.

मुंबई : कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेजमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता घडली. ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती. ती राहत असलेल्या घराच्या शेजारील इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन तिने उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून मुलीला वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केल्याचंही त्यात दिसत आहे. अनेक जण तिला उडी न मारण्याचं आवाहनही करत होते. परंतु मुलीने कोणाचंही न ऐकता उडी मारली. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. समतानगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























