एक्स्प्लोर
प्रति अशोक चव्हाण, चिवडा पाठवतोय, चिवडा वाटप करा : निलेश राणे

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यावरील नाराजी जगजाहीर आहे. मात्र, निलेश राणे यांनी ट्विटरवरुनही अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे.
“प्रति अशोक चव्हाण, चिवडा पाठवत आहे. पदं तुम्ही वाटू शकत नाही. किमान चिवडा वाटप करा.”, असं एका बॉक्सवर लिहून निलेश राणेंनी फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. शिवाय, या संदेशाखाली ‘काँग्रेस कार्यकर्ता, निलेश ना. राणे’, असे लिहिले आहे. त्यामुळे निलेश राणे यांची अशोक चव्हाणांवरील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/849547476436701185
निलेश राणे यांच्या ट्वीटनंतर कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर निलेश राणेंनी पुन्हा ट्वीट करत आवाहन केलं की, “चव्हाण साहेबांन बदद्ल कोणीही वाईट लिहु नका.. ते नेते आहेत.. ही लढाई एका विषयाची आहे बस!!”
https://twitter.com/meNeeleshNRane/status/849553582785515521
काही दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
