दरम्यान, 10 महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाण करणारी अफसाना शेख याआधी नीलम खन्ना यांच्याकडे काम करायची. त्यांचाही अनुभव तिचाबाबत फार काही चांगला नव्हता. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपला हाच अनुभव त्यांनी शेअर केला. अफसाना फारच विचित्र स्वभावाची होती असं तिचं म्हणणं आहे.
'बच्चे मरते क्यों नही?' अफसानाचं हे वाक्य ऐकूनच तिला कामावरुन काढून टाकलं: नीलम खन्ना
पूर्वा पाळणाघरात काम करण्याआधी अफसाना शेख नीलम खन्ना यांच्याकडे काम करायची. त्यावेळी तिच्या विचित्र वागण्यामुळे तिला खन्ना यांनी काढून टाकलं होतं. त्याचविषयी निलम खन्ना यांनी अफसानाबाबत धक्कादायक माहिती सांगितली.
'अफसाना ही विचित्र स्वभावाची बाई होती. सांगितलेलं कोणतंच काम ती नीट करत नसायची. किंबहुना काहीबाही बडबडत राहायची. तरीही सुरुवातीला आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. पण एके दिवशी अफसाना लादी पुसत असताना खाली पाणी सांडलं होतं. त्यावेली माझी लहान मुलगी धावत-धावत आली. ती फरशीवरुन खाली पडली. तेव्हा तिला खाली पडलेली पाहून अफसाना म्हणाली. की, 'बच्चे मरते क्यों नही?' तिचं हे वाक्यं ऐकून मला फारच धक्का बसला.'
'तिचं हे वाक्य ऐकताच माझ्या पतीनं तिला त्याचवेळी कामावरुन काढून टाकलं. त्यानंतर ती आमच्याच येथील एका शाळेत कामाला लागली. तेव्हा त्या शाळेत देखील आम्ही तिच्याबाबत माहिती दिली. कारण तिचं वर्तणूक कशी आहे ते मला चांगलंच माहित होतं. शाळेनं देखील तिला 15 दिवसांमध्येच कामावरुन काढून टाकलं. पण त्यानंतर ती इथल्या पाळणाघरात काम करते हे मला माहित नव्हतं. जेव्हा काल मी टीव्हीवर हे दृश्य पाहिलं तेव्हा मला प्रचंड धक्का बसला.' अशी माहिती नीलम खन्ना यांनी अफसानाबाबत सांगितली.
VIDEO:
संबंधित बातम्या: