एक्स्प्लोर
Advertisement
नायजेरियन तरुणांची गुंडगिरी, नालासोपाऱ्यात नागरिकांना मारहाण, 27 गाड्यांची तोडफोड
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमध्ये आज पहाटे साडेतीनच्या सुमारास काही नायजेरिअन गुंडांनी पाच ते सहा स्थानिक नागरिकांना जबर मारहाण केली आहे. तसेच 27 वाहनांची तोडफोडदेखील केली.
मुंबई : नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमध्ये आज पहाटे साडेतीनच्या सुमारास काही नायजेरिअन गुंडांनी पाच ते सहा स्थानिक नागरिकांना जबर मारहाण केली आहे. तसेच 27 वाहनांची तोडफोडदेखील केली. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री दोनच्या सुमारास जोसेफ नावाच्या एका नायजेरियन नागरिकाचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यानंतर भडकलेल्या नायजेरियन नागरिकांनी रागाच्या भरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टॅक्सी, टँकर, दुचाकी वाहनांच्या काचा फोडल्या, त्यांच नुकसान केलं.
आमच्या जोसेफ या नागरिकाला येथील स्थानिक तरुणांनी मारहाण केली होती. त्याला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमचे नागरिक भडकले आणि त्यांनी निषेध म्हणून तोडफोड केल्याची कबुली दाऊद नावाच्या नायजेरियन नागरिकाने दिली आहे.
सध्या या संपूर्ण भागात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. येथे काही नायजेरियन नागरिक राहतात. मात्र ते आता घराबाहेर निघू शकत नाहीत. स्थानिक नागरिकांची त्यांना भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया एका नायजेरियनने दिली आहे. पोलिसांनी सध्या जोसेफच्या मृत्यूबाबत तपास सुरु केला आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या नायजेरियन नागरिकांचे येथे मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरु आहेत. त्याचा आम्हाला त्रास होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement