मुंबई : अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी पुन्हा कस्टडी मागणारा अर्ज विशेष एनआयए कोर्टानं सोमवारी फेटाळून लावला. याप्रकरणांत झालेल्या अटकेनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस निरिक्षक सुनील मानेची पुढील चौकशी करण्यासाठी पुन्हा कस्टडी देण्याची मागणी करत या प्रकरणाचा तपास करणा-या एनआयएनं कोर्टात अर्ज केला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी हा अर्ज फेटाळून लावला.


तसेच या सुनावणीत सचिन वाझे आपल्या प्रकृती अस्वस्थ्याचा दाखला देत कोर्टापुढे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला. सचिन वाझेला वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्याचे निर्देश कोर्टानं जेल प्रशासनाला दिले आहेत. सचिन वाझेला हृदयरोगाचा त्रास असून त्याच्या उपचारांसाठीच वाझेनं अर्ज केला होता. या सुनावणीत आपली बाजू मांडताना सचिन वाझेने कोर्टाला सांगितलं की आपला फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे जेल कोठडीतच मृत्यू होऊ नये अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीनं योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. शहरी नक्षलवाद प्रकरणातील 84 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. 


संबंधित बातम्या :


परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुनच सचिन वाझे दोन कोटी वसुली करायचा", बिमल अग्रवाल यांचा आरोप


सचिन वाझेसह रियाझ काझीला जामीन नाकारला, एनआयएला याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास आणखीन 30 दिवसांची मुदतवाढ


Anil Parab यांना ED नोटीस येणं अपेक्षित होत, सूडाचं राजकारण जनतेलाही कळतं:Chhagan Bhujbal