एक्स्प्लोर
नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम पुढे ढकललं
1 फेब्रुवारीपासून नव्या वाशी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
![नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम पुढे ढकललं new vashi creek bridge reparing wor नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम पुढे ढकललं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/20174302/vashi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
नवी मुंबई : वाशी खाडीपुलाच्या जॉईंडर दुरुस्तीचं काम पुढे ढकलण्यात आलं आहे. आता 1 फेब्रुवारीपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या वाशी खाडी पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने लोखंडी जॉईंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील जाईंडर दुरूस्तीचं काम उद्यापासून 12 फेब्रुवारीपर्यंत हाती घेण्यात येणार होतं.
या कामामुळे 20 दिवस वाशी खाडी पुलावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर इतर वाहतुकीतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते.
पण आता हे काम पुढे ढकलण्यात आलं असून, 1 फेब्रुवारीपासून या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या
नव्या वाशी खाडी पुलावर 20 दिवस दुरुस्तीचं काम, एक मार्ग बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)