एक्स्प्लोर

ठाण्यात लवकरच धावणार 'हो रिक्षा'!

रिक्षावाल्यांनी भाडं नाकारल्यानं अनेकदा प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं, पण ठाणे शहरात लवकरच 'हो रिक्षा' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

ठाणे : रिक्षावाल्यांनी भाडं नाकारल्यानं अनेकदा प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं, पण  ठाणे शहरात लवकरच 'हो रिक्षा' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाचणार असून रिक्षाचालकांचाही फायदा होणार आहे. 'हो रिक्षा'.. नाव काहीतरी वेगळं वाटतंय ना? पण या नावातच सारं काही दडलं आहे. कारण या उपक्रमात रिक्षाचालकांना प्रत्येक प्रवाशाला 'हो' म्हणणं गरजेचं असणार आहे. आत्तापर्यंत कुठेही न वापरली गेलेली ही संकल्पना लवकरच ठाण्यात अस्तित्वात येणार आहे. या संकल्पनेत रिक्षेच्या पुढे दर्शनी भागावर 'हो रिक्षा' नावाचा स्टिकर लावण्यात येणार असून त्यानंतर या रिक्षाचालकाला एकही भाडं नाकारता येणार नाही. अशाप्रकारे दिवसभर एकही भाडं न नाकारणाऱ्या रिक्षाचालकांपैकी ५ रिक्षाचालकांना दररोज १५० रुपयांच्या किराणा खरेदीचे व्हाउचर्स देण्यात येणार आहेत. ठाणे शहरातलं अग्रगण्य दैनिक ठाणे वैभव आणि अपना बाझार यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येणार असून १ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते त्याची सुरुवात होणार आहे. जे रिक्षाचालक स्टिकर लावूनही भाडं नाकारतील, त्यांना या योजनेतून तात्काळ बाद केलं जाणार आहे. याबाबतची तक्रार आरटीओ किंवा ठाणे वैभवकडे करावी लागणार आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप तर वाचणार आहेच, पण प्रामाणिक रिक्षाचालकांचा फायदाही होणार आहे. त्यामुळं ठाण्यातल्या ३० हजार रिक्षाचालकांपैकी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे शहरात पहिल्यांदाच राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाचं ठाणे शहरातल्या प्रवाशांनी आणि रिक्षाचालकांनीही स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Mumbai Goregaon Toilet death: शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget