एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सेक्रेड गेम्स'चा गेम ओव्हर?
नेटफ्लिक्सवरील चर्चित वेब सिरीज सेक्रेड गेम्सशी संबंधित महत्वाच्या तीन व्यक्तींवर 'मीटू' अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर गेम ओव्हर होणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबई : नेटफ्लिक्सवरील चर्चित वेब सिरीज सेक्रेड गेम्सशी संबंधित महत्वाच्या तीन व्यक्तींवर 'मीटू' अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर गेम ओव्हर होणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
या वेब सिरीज सर्वात पहिला फटका बसला तो सेक्रेड गेम्सचा सहनिर्माता असलेल्या फॅन्टम या कंपनीला बसला. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाची घोषणा होताच कंपनीचा भागिदार असलेल्या विकास बहलवर सेक्रेड गेम्सच्या क्रू मेंबरमधल्या तरुणीने मीटूचे आरोप लावले. यामुळे फँटमला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सेक्रेड गेम्सला दुसरा झटका बसला, तो या मालिकेचा लेखक वरुण ग्रोव्हरला. एका लेखिकेने वरुण ग्रोव्हरने आपल्या छळ केल्याचा दावा केला. त्यामुळे सेक्रेड गेम्सच्या लेखकावरच झालेल्या आरोपाने खळबळ माजली.
सेक्रेड गेम्सला तिसरा आणि सर्वात मोठा झटका शुक्रवारी लागला. या सीरिजचा मुख्य नायक असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे या वेब सिरीजवरच मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. माजी मिस इंडिया निहारिका सिंहने नवाजुद्दीनवर शोषणाचे आरोप केले आहेत. मिस लवली या फिल्मच्या शूटिंगदरम्यान नवाझने छेळ केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, 'सेक्रेड गेम्स' फेम एलनाज नौरोजी हिने देखील दिग्दर्शक विपुल शाहवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. विपूल शाह हे 'नमस्ते इंग्लंड' या नुकत्याच रिलिज झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ऑडिशनसाठी मला विपूल शाह वारंवार बोलावत होते. त्यावेळी विपूल मला चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करण्याचा प्रयत्न करत होते शिवाय त्यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप एलनाज नौरोजीने केला आहे. विपूल शाहाने सांगितल्यानुसार एलनाज नौरोजीने मुंबईतल्या वर्सोवा आणि पंजाबमध्ये पटियाला इथे विपूल शहांसमोर ऑडिशन दिले. मात्र दोन्ही ठिकणी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न विपूल शहांनी केल्याचे ऐलनाज नौरोजीने म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement