एक्स्प्लोर
Advertisement
'दगडी चाळ' पाहून काकाकडे खंडणी मागणाऱ्या पुतण्याला अटक
'दीड कोटी रुपये द्या, अन्यथा तुला आणि तुझा मुलाला मारुन टाकू' अशी धमकी मुंबईतील व्यावसायिकाला देण्यात आली.
मुंबई : 'दगडी चाळ' हा मराठी चित्रपट पाहून प्रेरित झालेल्या एका पुतण्याने आपल्या काकांकडेच खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे. कुप्रसिद्ध डॉन अरुण गवळीच्या नावाने दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईतील मुलुंडमध्ये उघडकीस आला.
ट्रॅक्टरचे सुटे पार्ट्स बनवणाऱ्या वीरभाई पांचाळ या व्यावसायिकाला 25 मार्चला रात्री एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीला वीरभाईंची कंपनी, गाडी आणि मुलगा याविषयी संपूर्ण माहिती होती. 'दीड कोटी रुपये द्या, अन्यथा तुला आणि तुझा मुलाला मारुन टाकू' अशी धमकी त्यांना देण्यात आली.
या धमकीकडे पांचाळ यांनी दुर्लक्ष केलं. परंतु पुन्हा 27 मार्चला त्यांना अशीच धमकी आली. अरुण गवळी यांच्या टोळीतून रघु शिंदे बोलत असल्याचं सांगून फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या घरातील सर्व माहिती सांगितली. दीड कोटी रुपये न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी पुन्हा देण्यात आली.
पांचाळ यांनी त्वरित या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना दिली. पोलिसांनी कलम 389 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. धमकीचे फोन मुरबाडवरुन आल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी मुरबाडमध्ये कसून चौकशी केली असता पांचाळांचा पुतण्या विशाल पांचाळ आणि मुरबाडमध्ये राहत असलेला त्याचा मित्र इद्रीस आशिम या दोघांनी ही धमकी दिल्याचं उघड झालं.
विशालला स्वतःचा खिळे बनवण्याचा कारखाना टाकायचा होता. यासाठी त्याला पैशांची गरज होती आणि त्यासाठी त्याने दगडी चाळ हा चित्रपट पाहून ही शक्कल लढवली. पोलिसांनी विशाल पांचाळसह इद्रीसला बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement