एक्स्प्लोर

राष्ट्रवादीला धक्का, निरंजन डावखरे भाजपत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित निरंजन डावखरे गुरुवारी (उद्या) भाजपत प्रवेश करणार आहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. कारण आमदार निरंजन डावखरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित निरंजन डावखरे गुरुवारी (उद्या) भाजपत प्रवेश करणार आहेत. निरंजन डावखरे यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामाही दिला आहे. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. मात्र आता ते राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे राजकीय अंदाज घेत, निरंजन डावखरे भाजपशी संधान साधलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निरंजन डावखरे हे भाजपशी जवळीक साधत असल्याची चर्चा होती. शिवाय स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निरंजन डावखरेंच्या संपर्कात होते. आता पालघर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निरंजन डावखरे भजापत प्रवेश करणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.  त्यांची टर्म संपत असल्याने त्यांना लवकरच निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून मतदान होणार आहे. भाजप खासदर कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, तर शिवसेनेतून आमदार उदय सामंत यांच्या मदतीची  गरज लागणार आहे.  त्यामुळे राष्ट्रवादीतून पुन्हा निवडून येणं कठीण असल्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. आता त्यांनी थेट भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. निरंजन डावखरे यांचा राजीनामा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला, असं डावखरे यांच्या कार्यालयाने जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे, असे नमूद करीत आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. आपली पुढील वाटचाल लवकरच जाहीर करणार असल्याचे डावखरेंनी नमूद केले. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला. निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून 2012 मध्ये निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरु होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधानपरिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नव्हती. आताही या गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्थरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे निरंजन डावखरे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget