मुंबई : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय वर्तुळात आपल्या उत्तुंग कारकिर्दीनं सानथोरांपासून सर्वांवर प्रभाव पाडणाऱ्या आणि अनेक नवोदित नेतेमंडळींसाठी आदर्शस्थानी असणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांचं मार्गदर्शन काही नेत्यांना मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कानमंत्र देणार आहेत.


(NCP) राष्ट्रवादी काँग्रेसक़़डूनच ही बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे अशा बड्या नेत्यांची आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांचीही या बैठकीला उपस्थिती असणार आहे.


शरद पवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार : नवाब मलिक


शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांप्रमाणंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादीनंही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. पराभूत उमेदवारांना या बैठकीच बोलवत स्थानिकांचे प्रलंबित प्रश्न आणि पराभवाच्या कारणांवर चर्चा करत त्यावर सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातही पवार मार्गदर्शन करणात आहेत. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी कशी असणं अपेक्षित आहे याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.





मंत्री आणि नेतेमंडळींसह जिल्हा स्तरावर असणाऱ्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. येत्या काळाती महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस आणि शिवसेनेसमवेत निवडणूक लढायची झाल्यास त्यासाठीची रणनिती कशी असेल याची आखणीही या बैठकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.