मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी जोरदार राजकारण सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मला मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. जर कुणी सीबीआय चौकशीची मागणी करत असेल तर मी त्याचा विरोध करेन, असंही पवारांनी म्हटलं.
शरद पवार पुढे म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. मुंबई पोलिसांना मी गेली 50 वर्षे ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होतंय. परंतु त्याची चर्चा ज्या पद्धतीने होतेय त्याचे मला आश्चर्य वाटते.
सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. मुंबई पोलीस याप्रकरणी आत्महत्या यासह इतर बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पटना येथे याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली. एफआयआरमध्ये सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर बिहार पोलीस चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होती. मात्र मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यामध्ये समोरासमोर आले होते. बिहार पोलिसांच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. पटना पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. हे प्रकरण मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी तिने केली आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
- SSR Suicide Case | 'विनाकारण माझा छळ चाललाय'; सूरज पांचोलीची वर्सोवा पोलिसांत तक्रार
- "पिता म्हणून मला सुशांतची सर्व माहिती असणं गरजेचं आहे", सुशांतच्या वडिलांचा रियाला व्हॉट्सअॅप मेजेस
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन
- सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड
- सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा
- दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण