एक्स्प्लोर

माझ्यापासून काही लपवत नाहीस ना? होम क्वॉरन्टाईन असलेल्या जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांचा फोन

मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.

मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरन्टाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात ठाणे येथील पत्रकार, कॅमेरामन देखील आल्याने त्यांनादेखील क्वॉरन्टाईन होण्यास सांगितले आहे. आव्हाड यांना होम क्वॉरन्टाईन केल्याची बातमी कळताच खुद्द राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन चौकशी केली आहे. याबद्दलची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: आपल्या फेसबुकवरुन दिली आहे. Coronavirus | Jitendra Awhad | कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वॉरंटाईन फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? अचानक साहेबांचा फोन आला. आवाजामध्ये एक माया, आपलेपणा, काळजी हे सगळ दिसत होत. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटल साहेब सगळ ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हटल साहेब ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत. शांत पण अस्वस्थ गरीबा बद्दल त्यांची तळमळ आम्ही ओळखुन आहोत पण, साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आतातर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही. तुमचेच संस्कार लोकांसाठी लढायचे एक फोन आणि जादू झाली आशीर्वाद असावेत! अशा आशयाची भावनिक पोस्ट आव्हाडांनी शेअर केली आहे. दरम्यान शरद पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांना असलेली आत्मीयता आपल्याला वेळोवेळी दिसूव आली आहे. दरम्यान लहानपणी चाळीत राहणाऱ्या मुलाला चाळींचा विकास करण्याचं मंत्रीपद पद मिळालं. शरद पवार यांच्याइतका सामाजिक भान असलेला नेता दुसरा महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नसल्याचही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. Coronavirus | मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना

महत्त्वाच्या बातम्या

सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
Mumbai Dam Water Storage : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
Mumbai Rain Red Alert: मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Embed widget