एक्स्प्लोर

मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं, शरद पवारांचा हल्लाबोल

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला.

मुंबई : केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की,  सर्व राजकीय पक्षांच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसायला हवं. 6 महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह यांनी आम्हाला बोलावलं होतं.  त्यामध्ये भारत चीन बॉर्डरवर नेमकं काय सुरू आहे याबाबत आम्हाला सांगितलं होतं. केंद्रावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दुसरीकडे चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या, पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. 

पवार म्हणाले की, काल जे जवान शहीद झाले अशाप्रकारे मागच्या काही दिवसांत सातत्याने आशा बाबी घडत आहेत. त्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं. केंद्र सरकार काही संस्थांचा सातत्याने गैर वापर करत आहे. यामध्ये सीबीआय, ईडी, एनसीबी आशा संस्थांचा वापर करत आहे. काही उदाहरणे सांगायचं झालं तर अनिल देशमुख यांचे उदाहरण घेता येईल. देशमुख यांच्याबाबत मागच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते आता कुठं आहेत हेच माहिती नाही.ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले. पवार म्हणाले की, एक जबाबदार अधिकारी याबाबत आरोप करतो आहे. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला मात्र दुसरा व्यक्ती मात्र गायब झाला आहे. हा फरक सध्या आपल्याला पाहिला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांच्या घरी काल 5 वेळा छापे मारी केली. त्यांना नेमकं काय तिथं मिळत आहे कळत नाही. याबाबत जनतेने देखील विचार करायला हवा, असं पवार म्हणाले. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा

पवार म्हणाले की, मागच्या काही दिवसांत लखीमपुरची घटना घडली. ती घटना सुदैवाने मीडियामुळं बाहेर आली. यामध्ये शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली यामध्ये एक पत्रकार देखील त्यामध्ये होता. असा प्रकार या आधी असं कधी झालं नव्हतं. त्यामध्ये एक बाब समोर आली की केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे चिरंजीव त्यामध्ये होते. जवळपास 6 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने यावर भाष्य केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे तोपर्यंत हा व्यक्ती त्यामध्ये नव्हता असं त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात येत होतं. जरी त्यांचा व्यक्ती असला तरी त्यांनी लगेचच कारवाई करण्यात यायला हवी. या घटनेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ पदावरून मुक्त व्हावं, असं ते म्हणाले.

मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं

मावळ घटनेसंदर्भात होत असलेल्या आरोपांवरुन पवार म्हणाले की, मावळमध्ये काय झालं असा आरोप भाजपने केला. त्यांना सांगायचं आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. माजी गृहमंत्री यांनी-लखीमपूर घटनेशी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावं की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झालं की या घटनेला सरकार जबाबदार नव्हतं तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. मावळच्या घटनेबाबत ज्यावेळी लोकांना कळलं त्यानंतर हे स्पष्ट झालं की सरकार याला जबाबदार नव्हतं. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले आहेत, असं शरद पवार म्हणाले. 

साखर कारखान्यांची स्थिती गंभीर

शरद पवार म्हणाले की, पुढील 15 दिवसांत महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होतील. काही लोकांनी अशी सुरुवात केली आहे की, उसाचे पैसे आम्हांला तुकड्या तुकड्यात देऊ नका आम्हाला एक रक्कमी पैसे द्या. त्यामुळे ज्या कारखान्याची पैसे द्यायची ऐपत नाही त्यांनी पैसे द्यायचे कसे. त्यामुळे मुंबईतुन ज्याप्रकारे कापड गिरण्या गायब झाल्या तशा प्रकारची परिस्थिती कारखान्यांच्या बाबत होऊ नये, असं ते म्हणाले. 

मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे

शरद पवार म्हणाले की,  अजित पवार यांचं भाष्य मी ऐकलं. ते बोलले की मी अर्थमंत्री आहे. कर चोरी आम्ही करत नाही. कारण मंत्री म्ह्णून मला याबाबत माहिती आहे. मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे आले आहेत. पाहुणचार किती घ्यावा याला देखील लिमिट आहे. पाहुणचार घ्यावा परंतु अजीर्ण होईल इतका घेऊ नये. अजूनही काही ठिकाणी अजूनही ते अधिकारी आहेत. मी आमच्या घरी चौकशी केली त्यावेळी एक लक्षात आलं की एका घरामध्ये 18 अधिकारी आले होते. आमच्या घरातील दोघे जण होते परंतु त्यांच्या घरी 18 जण येऊन थांबले होते. आता ही छोटी घरं आहेत यामध्ये कसं ऍडजस्ट करायचं हे त्यांना कळायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Mumbai BMC Standing Committee :बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget