एक्स्प्लोर

अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आज देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार ही भूमिका घेतल्याने सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. अजित दादा यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. मात्र दुर्दैवाने ते मुख्यमंत्री झाले नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई : एकीकडे राज्यात शिवसेना-भाजप युतीत सत्तास्थापनेवरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना विरोधी पक्षांची मात्र बैठकांची लगबग सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नाशिक दौऱ्यानंतर आज मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. काल काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन आले आहेत. या बैठकीत शिवसेनेने पाठिंबा मागितला तर काय भूमिका असावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी आपल्या घरी प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आज देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार ही भूमिका घेतल्याने सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. शरद पवार यांच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे की अजित पवार यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे?

याधी काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे वर्ष 2003-2004 मध्ये दिल्लीतून येऊन मुख्यमंत्री झाले होते. त्याआधी ते लोकसभेत होते. पृथ्वीराज चव्हाण हे देखील केंद्रात पीएमओमध्ये मंत्री असताना आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांचा राजीनामा झाल्यावर त्यांना राज्यतील मुख्यमंत्री पदाची जबादारी मिळाली होती. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता विधीमंडळात नसलेल्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. अजित दादा यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. मात्र दुर्दैवाने ते मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होत राहणार की नेमकं राज्यात मुख्यमंत्री होण्याची संधी कोणाला मिळणार, कुणाची सत्ता येणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा
महावीर जयंतीच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचं उल्लंघन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवींसानंतर एकनाथ शिंदेंचं भाषण, नेमकं काय घडलं?
महावीर जयंतीच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचं उल्लंघन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवींसानंतर एकनाथ शिंदेंचं भाषण, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget