मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मुंबईतल्या खारमधील (Mumbai Khar) निवासस्थानी चोरी झाली आहे. नोकरानेच चोरी केल्याचं उघड झाले आहे . चोरीप्रकरणी नोकर अर्जुन मुखियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांच्या घरातून दोन लाखाची कॅश लंपास करण्यात आली आहे. पैसे घेऊन तो त्याच्या मुळगावी बिहारला (Bihar) पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा मुंबईत खार येथे फ्लॅट आहे. खार येथील लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर राणा यांच्या मालकीचे घर आहे. या सदनिकेत अर्जुन मुखिया हा घरगडी म्हणून काम करतो. गेल्या दहा महिन्या पासून तो याच फ्लॅटवर राहात होता. रवी राणा यांनी त्यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम करणाऱ्या संदीप सुभाष ससे यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. खर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले होते. यावेळी कपाटात दोन लाख रुपये नव्हते.
नोकराविरोधात खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
संपूर्ण कपाटाची पाहणी करुनही त्यांना कुठेच पैसे मिळाले नाहीत.त्यानंतर त्यांनी घरात शोधाशोध केली असता रक्कम चोरीला गेली, तसेच घरगडी म्हणून काम करणारा अर्जुन देखील गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संदीप ससे यांनी खार पोलिसात नोकर अर्जुन मुखिया याच्याविरोधात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलीसांनी अर्जुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
पैसे घेऊन बिहारला गेल्याचा संशय
राणा यांचा पीए संदीप सुभाष ससे यांच्यावर या फ्लॅटची जबाबदारी आहे. नोकर अर्जुन मुखिया हा मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. मार्च महिन्यांत तो होळीनिमित्त त्याच्या गावी गेला. त्यानंतर तो परत आला नाही. राणा यांच्या पीएने अर्जुनला अनेकदा कॉल केला होता. मात्र त्याने कॉल घेतला नाही. चोरी करून तो त्याच्या बिहारमधील दरभंगा या गावी पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम तयार करण्यात आली आहे. ही टिम तिथे जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा :
Navneet Kaur : 15 मिनिटं विरुद्ध 15 सेकंद वाद पोलीस ठाण्यात; नवनीत राणांविरोधात गुन्हा, प्रकरण नेमकं काय?