मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना हाताशी धरत वेगळी वाट धरल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक विभागाला गेला. काही जणांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ कायम ठेवली तर काही जणांना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. दीड वर्षात दोन्ही गटातील कार्यकर्ते अनेकदा आमनेसामने आले. मंगळवारी देखील  वाकोल्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले.  शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिवचलं . उज्जवल निकम आणि नीलम गोऱ्हेंच्या सभेनंतर वाद झाला. गद्दारवरुन दोन गटात वाद झाला असून पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण आटोक्यात आले आहे.  


वाकोल्यात शिवसेना  शिंदेगट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.   वाकोल्यात उत्तर पश्चिमचे उमेदवार उज्वल निकम आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंच्या सभेनंतर वाद  झाला. वॉर्ड क्रमांक 88 येथे सभा आटपून परतणाऱ्या शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 'गद्दार' म्हणून चिडवले. यावरून दोन गटात  वाद  झाला वेळीच पोलिस घटनस्थळी दाखल झाल्याने प्रकरण आटोक्यात आले . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे पुन्हा अशी घटना घडणार नसल्याची ग्वाही  दिली.  


शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा


शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना गद्दार म्हणून डिवचले त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला आहे. शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 


नाशिकमध्ये भाजप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाची मोडतोड करणे, कार्यकर्त्यांशी हुज्जत घालून बाचाबाची केल्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे विरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.महायुतीचे उमेदवार हेंमत गोडसें यांच्या प्रचार निमित्ताने सिडको परिसरात रॅली काढण्यात आली होती. उद्धव  बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालया समोरून रॅली जात असताना मुकेश सहाणे यांनी कार्यकर्त्यांशी बाचाबाची करत मशाल चिन्हाची मोडतोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी उबाठा गटाचे प्रमुख पदाधिकारी अंबड पोलिस ठाण्यात गेले होते. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी संयम दाखवला आहे,मात्र हा संयम सुटण्याचा आता संबंधितवर कारवाई करण्याची मागणी  होत आहे.


हे ही वाचा :


PM Modi Jiretop: प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड