सोमवारी रात्री दुकानाची मागची भिंत तोडून दोन चोरटे आत घुसले आणि 50 लाख 90 हजारांचे दागिने चोरले. चोरी केल्यानंतर आरोपींनी पोबारा केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे एका चाळीमध्ये मयुर ज्वेलर्सच्या मागच्या रुममध्ये या आरोपींनी चार दिवसांपूर्वी रुम भाड्याने घेतली होती. भाड्याने घेतलेल्या रुमची मागील भिंत आणि ज्वलर्सची मागील भिंत एकच आहे.