Navi Mumbai Budget : नवी मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर केला आहे. तब्बल 4 हजार 910 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून 4 हजार 908 कोटी खर्च दाखविण्यात आला आहे. कोरोना काळापासून महानगर पालिकेचे उत्पन्न घटले असले, तरी अर्थसंकल्प 5 हजारा कोटींच्या घरात बनवला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत फुगीर आकडे नसून पुढील वर्षी मनपाचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे. दरम्यान कोरोना काळात न झालेल्या कामांची जंत्री या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.
जगभरात कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवहार तसंच जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. अशामध्ये सरकारलाही मोठं नुकसान झालं असून सर्वच शासनांचं उत्पन्न देखील घटलं आहे. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेचा मागील वर्षात उत्पन्न घटलं आहे. पण तरी यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 5 हजार कोटींच्या घरात बनवल्याने या अर्थसंकल्पाबाबत मोठी चर्चा सुरु आहे.
नवी मुंबई पालिकेकडून करण्यात येणारी महत्वाची कामे -
- घणसोली - ऐरोलीला जोडण्यासाठी खाडी किनार्यावरून उड्डाणपुल बांधणे.
- ऐरोली - काटईनाका उन्नत मार्गावर ठाणे - बेलापूर मार्गावर चढ उतारासाठी लिंक तयार करणे.
- वाशीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाशी ते कोपरी उड्डाणपूल तयार करणे.
- शहरातील युवकांना जागतीक स्थरावरील पोहण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अद्यावत तरणतलाव वाशी येथे उभारणे.
- नेरूळ येथील वंडर्स पार्क येथील 8.50 एकर जागेवर सायन्स पार्क उभारणे.
- शहरातील जुन्या लाईट काढून लाईट बिल वाचविण्यासाठी सगळीकडे एलईडी बल्ब बसवणे.
- शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि परिवहनचा डिझेल, पेट्रोल वरील खर्च संपविण्यासाठी शंभर टक्के इलेट्रीक बस चालवणे.
- ऐरोलीमध्ये शहरातील दुसरे नाट्यगृह उभारणे.
- महिलांना प्रसूतीसाठी अद्यावत उपचार मिळावेत यासाठी कोपरखैरणे आणि दिघा येथे बालमाता रूग्णालय उभारणे.
- नैसर्गिक उर्जा मिळावी यासाठी मोरबे धरणावर 100 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर उर्जा आणि 1.5 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारणे.
हे ही वाचा -
- Navi Mumbai Election : नवी मुंबई पालिका प्रभाग रचनेतील घोळांबाबत अनेक हरकती, 122 वाॅर्डांसाठी 3 हजार 800 हरकती
- नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम, आता बसमध्येही ग्रंथालयाची सुविधा
- पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live