एक्स्प्लोर

नवी मुंबईतील इंजिनिअरच्या हत्येप्रकरणी डबेवाल्यासह तिघांना जन्मठेप

ऑगस्ट 2010 मध्ये 23 वर्षीय दीपनची ऐरोलीतील राहत्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. लुटीच्या उद्देशाने तिघे आरोपी दीपनच्या घरात घुसले होते.

नवी मुंबई : नवी मुंबईतील इंजिनिअर तरुणाची हत्या केल्याप्रकरणी डबेवाल्यासह तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एल अँड टी कंपनीत कार्यरत असलेल्या दीपन बॅनर्जीची 2010 साली हत्या करण्यात आली होती. ठाणे जिल्हा कोर्टाने मंगळवारी तीन आरोपींना शिक्षा सुनावली. दीपनला डबा पुरवणारा डबेवाला विनोद बांदलने त्याला लुटण्याचा प्लान आखला होता. विनोदने आपले सहकारी सुरज गुरव आणि संतोष राऊत यांनाही दीपनला लुटण्याच्या कटात सहभागी करुन घेतलं. मात्र याची अखेर दीपनच्या हत्येत झाली. जज एच एम पटवर्धन यांनी शिक्षा सुनावताच दीपनच्या मोठ्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मात्र तिन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. ऑगस्ट 2010 मध्ये 23 वर्षीय दीपनची ऐरोलीतील राहत्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. लुटीच्या उद्देशाने तिघे आरोपी दीपनच्या घरात घुसले होते. दीपनला भरघोस पगाराची नोकरी असल्याच्या समजातून त्यांनी लुटीचा डाव आखला. त्याच्या घरी भरपूर पैसा असेल, असा त्यांचा समज होता, मात्र त्यांना अडीचशे रुपयेच कॅश मिळाली. त्याशिवाय कॅमेरा, लॅपटॉप, क्रेडीट-डेबिट कार्ड आणि मोबाईल चार्जर या वस्तू त्यांनी चोरल्या. कमी रक्कम मिळाल्यामुळे तिघांनी दीपनला भोसकून मारलं. कलम 302 (हत्या), 394 (चोरी करताना एखाद्याला मुद्दामहून केलेली दुखापत), 397 (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने चोरी किंवा दरोडा) यासारख्या कलमांअंतर्गत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या चारच दिवसात आरोपींना अटक केली होती. त्याचप्रमाणे तिघांकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. कोर्टात 41 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सहा जणांनी साक्ष बदलली. नवी मुंबई पोलिसांनी दीपनच्या घरातील कपाटावरुन दोघांचे फिंगरप्रिंट्स मिळवले होते. त्याचप्रमाणे चोरीचा मालही सापडला होता. गुन्ह्यात थेट सहभाग नसल्यामुळे चोरीचा माल ठेवणाऱ्या दोघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या दीपनने कोलकात्याच्या कॉलेजमधून तिसरा क्रमांक मिळवला होता. पदवीनंतर त्याला लगेच एल अँड टी कंपनीत नोकरी मिळाली आणि तो नवी मुंबईत स्थायिक झाला.

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget