एक्स्प्लोर

खंडणीसाठी मारहाण, भाजप नगरसेवकाला अखेर बेड्या

आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

नवी मुंबई : खारघर येथील सेक्टर-4 येथे नव्यानेच हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाला 50 हजार रुपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात नगरसेवक शत्रुघ्न काकडे आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी मागणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून आरोपी फरार होते. आज खारघर पोलीसांनी शत्रुघ्न काकडेसह चार आरोपींना अटक करुन, पनवेल कोर्टात हजर केले असता, 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या मारहाणीत जखमी झालेले इम्तियाज शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेमकं काय प्रकरण आहे? नवी मुंबईतील खारघर इथल्या सेक्टर 4 इथे नवीन हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाला 50 हजार रुपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली. आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक इस्माईल शेख यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह इस्माईल यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना आणि कामगारांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे, त्यांचे नातेवाईक आणि साथीदार अशा दहा जणांवर खंडणी मागणं, मारहाण करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शत्रुघ्न काकडे फरार होता. खारघरमध्ये अशाप्रकारे गावगुंडांचा त्रास व्यावसायिकांना होत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget