एक्स्प्लोर

एक्झिट पोल आणि मोदींचं केदारनाथ मंदिरात जाणं ही नौटंकी : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपवून थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला गेले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपवून थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला गेले होते. मोदींच्या या केदारनाथ दर्शनावर विरोधकांचं टीका करणे सुरुच आहे. त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भर पडली आहे. शरद पवार यांनी मोदींच्या केदारनाथ दर्शनाला 'नौटंकी' असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीदरम्यान पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी मोदींना लक्ष्य केले. शरद पवार यावेळी म्हणाले की, "सध्या राजकारणात नौटंकी सुरु आहे. काल संध्याकाळपासून वृत्तवाहिन्यांवरही नौटंकीच चालू होती. मोदींचं केदारनाथला जाणं हीदेखील नौटंकी आहे." काल देशभरातील सर्व वृत्तवाहिन्यांनी मांडलेल्या एक्झिट पोलबाबत बोलताना पवार म्हणाले की, "इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मागे एक मोठी ताकद उभी आहे. त्यामुळे ते वेगळी लाईन मांडत आहेत. परंतु येत्या दोन दिवसांत सत्य समोर येईल. लोकांच्या चिंता दूर होतील." शरद पवार म्हणाले की, "मोदींच्या केदारनाथ यात्रेबाबत पवार म्हणाले की, निवडणूक होतात, कोणी जिंकतं तर कोणी हरतं, परंतु ज्याच्यावर देशाची जबाबदारी आहे, ती व्यक्ती हिमालयात जाऊन बसली आहे. अशा प्रकारचं चित्र मी पहिल्यांदाच पाहत आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget