एक्स्प्लोर
गणराया नेहमीच वेगळं घडवतो, पात्र वेगळी असतात : राणे
वैयक्तिकरित्या गणपतीकडे काही मागावं, असं त्याने काही ठेवलं नाही. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आले. दर्शन घेतलं आणि 15-20 मिनिटं थांबून निघाले, असं नारायण राणे म्हणाले.

मुंबई : 'गणराया नेहमीच काहीतरी नवनवीन घडवतो असतो. फक्त पात्र वेगळी असतात. यावेळचं पात्र कोणतं असेल हे लवकरच कळेल' असं सूचक विधान काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं. नारायण राणेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. हा फोटो आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन शेअरही केला होता. 'वैयक्तिकरित्या गणपतीकडे काही मागावं, असं त्याने काही ठेवलं नाही. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आले. दर्शन घेतलं आणि 15-20 मिनिटं थांबून निघाले. या व्यतिरिक्त काही चर्चा झाली नाही.' असं राणे म्हणाले.
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री राणेंच्या घरी!
'आम्ही दोघंही न बोलता बातम्या येत असतील, तर आमची काही हरकत नाही. गेला महिनाभर पत्रकार अंदाजच बांधत आहेत. मुहूर्तच मुहूर्त देत आहेत.' असा टोलाही त्यांनी हाणला. 'गणराया नेहमीच काहीतरी नवनवीन घडवतो असतो. फक्त पात्र वेगळी असतात. यावेळचं पात्र कोणतं असेल हे लवकरच कळेल' असं सूचक विधानही त्यांनी केलं. राणेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा जोरात असताना मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतल्याने चर्चेला आणखी पेव फुटलं आहे. संबंधित बातम्या : नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला? राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?
अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच?
Before You Go
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















