एक्स्प्लोर

भाजपची ऑफर जुनीच, अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही : राणे

मुंबई : "मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही," असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं. अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्य समोर आल्यानंतर नारायण राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी ही दृश्यं खोटी ठरवत कोणाशीही भेट झाली नसल्याचा दावा केला. तसंच मुख्यमंत्र्यांना अधिवेशाच्या काळात दोनवेळाच भेटलो होतो, असंही राणेंनी नमूद केलं. अहमदाबादेत वैयक्तिक काम "अहमदाबादमधल्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती. मी रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही. त्यामुळे मीटिंग आटोपल्यानंतर अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रश्चन नाही," असं राणेंनी सांगितलं. "जर मी अमित शाह यांच्या घरी गेलो असं म्हणता, तर तिथला फोटो दाखवा. तिथून बाहेर पडतानाचा व्हिडीओ आहे का?" असा सवालही राणेंनी विचारला. Narayan_Rane_1 भाजपकडून जुनीच ऑफर "मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना," अशी कोपरखळी नारायण राणेंनी मारली. "भाजपकडून ऑफर येते, मात्र त्यावर अजून विचार केलेला नाही. भाजपच्या ऑफरला मी नकारही दिला नाही आणि होकारही दिला. कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही," असं नारायण राणेे म्हणाले. रिपाइंची संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो "मला रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या पक्षात येण्यासाठी मला विचारलं होतं. मात्र, मी नकार देऊन संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो,” असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं. राणे-मुख्यमंत्री एकाच सीटवर भाजपची ऑफर जुनीच, अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही : राणे दरम्यान, अहमदाबादमध्ये नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसतंय. ‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. मात्र काल राणेही अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे निर्णयाच्या वेळेला बोलेन, तेव्हाचं तेव्हा : नारायण राणे राहुल गांधींनी सर्व ऐकून घेतलं, मात्र माझ्या तक्रारीचं निवारण नाही : नारायण राणे मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात दोनदाच भेटलो : नारायण राणे भाजपकडून ऑफर येते, आता मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना : नारायण राणे परवा जयकुमार रावल घरी आले होते, त्यांच्याशी हॉलमध्ये बसून पक्षबदलाची चर्चा करु का? : नारायण राणे कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही : नारायण राणे मी अमित शाह यांच्या घरी सोबत असतानाचा फोटो दाखवा : नारायण राणे मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का? : नारायण राणे रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही : नारायण राणे भाजपची ऑफर जुनीच, पण नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही : नारायण राणे देवेंद्र फडणवीस आणि शाहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं असतं का?: नारायण राणे जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता : नारायण राणे वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला गेलो होतो, सकाळी पावणे सात वाजता मुंबईत : नारायण राणे काल मी अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही : नारायण राणे अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती : नारायण राणे नारायण राणेंची संपूर्ण पत्रकार परिषद संबंधित बातम्या पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री! राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट? नारायण राणे यांचा राजकीय प्रवास नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार? PHOTO : नारायण राणे, नितेश आणि मुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget