एक्स्प्लोर

भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणेंना स्थान

राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त अरुण जेटली, पियूष गोयल, शिवराज सिंह चौहन यांच्यासह एकूण 20 नेत्यांचा आणि मंत्र्यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे यांना सोळावं स्थान देण्यात आलं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जाहीरनामा कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खासदार नारायण राणे यांनाही जाहीरनामा समितीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त अरुण जेटली, पियूष गोयल, शिवराज सिंह चौहन यांच्यासह एकूण 20 नेत्यांचा आणि मंत्र्यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे यांना सोळावं स्थान देण्यात आलं आहे.

युतीत शिवसेना असल्यास मी युतीत सामील होणार नाही अशी नारायण राणे यांची भूमिका होती. मात्र त्याच नारायण राणेंचा भाजपच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणेंचा जाहीरनामा समितीत समावेश हा भाजपचा शिवसेनेला इशारा आहे का? अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

जाहीरनामा कमिटी व्यतिरिक्त प्रचार-प्रसार समिती आणि सामाजिक स्वयंसेव संघटन संपर्क समितीची निर्मिती केली आहे. प्रचार-प्रसार समितीची जबाबदारी अरुण जेटली यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या समितीत जेटलींसह इतर आठ मंत्री आणि नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

तर सामाजिक स्वयंसेवी संघटन संपर्क समितीची जबाबदारी भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या समितीत भाजपच्या 13 मंत्री आणि नेत्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
Embed widget